शाही, परतीच्या मार्गाची पोलिसांनी केली पाहणी

By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-05T23:38:58+5:302014-07-06T00:12:15+5:30

शाही, परतीच्या मार्गाची पोलिसांनी केली पाहणी

Shahi, return visits by the police | शाही, परतीच्या मार्गाची पोलिसांनी केली पाहणी

शाही, परतीच्या मार्गाची पोलिसांनी केली पाहणी

नाशिक : वर्षभरावर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून काय खबरदारी घ्यायची, तसेच कोठे कोठे पोलीस बळ तैनात करायचे यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त प्रशिक्षण देण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतील, तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी आखाडे, तसेच सिंहस्थ कुंभमेळा शाही व परतीच्या मार्गाची पाहणी केली.
तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पुढे दिगंबर आखाडा, तपोवन क्रॉसिंग, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती, लक्ष्मणझुला, नाग चौक, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, रामकुंड येथून पुढे परतीचा मार्ग श्री कपालेश्वर मंदिर, मालवीय चौक, राजवाडा, शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक, गुरुद्वारारोड, वेताळबाबा मंदिर, काट्या मारुती मंदिर, बस डेपो, नवीन आडगाव नाका, स्वामिनारायण पोलीस चौकी, श्री संत जनार्दनस्वामी आश्रम व पुढे तपोवन साधुग्रामपर्यंत पाहणी केली. या प्रशिक्षणात सहायक पोलीस निरीक्षक वैशाली शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन, तर सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर सय्यद यांनी साधू-महंतांचे आखाडे, विविध घाट यांबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. या प्रशिक्षण दौऱ्यात सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वाहतूक पोलीस निरीक्षक दादेराव, सिंहस्थ शाखेचे मिलिंद तेलोरे आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Shahi, return visits by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.