उपनगरमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: March 25, 2017 17:12 IST2017-03-25T17:02:40+5:302017-03-25T17:12:47+5:30
ओळखीचा गैरफायदा : धमकावून उद्यानात बोलावून केला अत्याचार : पोलिसांत गुन्हा दाखल

उपनगरमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नाशिक : ओळखीतील अल्पवयीन मुलीला फोनवर धमकावून उद्यानात बोलावून घेत तिच्यावर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि़२०) सायंकाळच्या सुमारास जयभवानी रोडवरील मनोहर गार्डनमध्ये घडली़
उपनगर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ओळखीतील संशयित फैजान खान याने सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास फोनवर धमकी देऊन निसर्ग उपचार केंद्राजवळील मनोहर उद्यानात बोलावून घेतले़ तसेच या मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अश्लील चाळे करीत बळजबरी लैंगिक अत्याचार केला़ या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने प्रथम या घटनेची वाच्यता केली नाही़ मात्र, शुक्रवारी (दि़२४) पहाटे उपनगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली़
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित फैजान इम्रान खान(२८, रा़शांती पार्क, उपनगर, नाशिकरोड) विरोधात बलात्कार तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)