शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

हरिहर गड सर करणाऱ्या सत्तर वर्षीय आजींची कोरोनावरही मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर ...

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड

सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात

व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु

दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास

यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन

मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र,

त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांना भीती वाटते आणि त्यामुळे त्यांच्या

प्रकृतीवर अधिकच परिणाम होतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग

झाला तरी धक्का बसतो; परंतु आशा आंबाडे यांनी मात्र आपल्यावरील या

संकटाला न घाबरता तोंड दिले. गेल्या २० मार्च रोजी खरे तर त्यांनी

कोराेना प्रतिबंधकात्मक लस घेतली आणि त्यानंतर त्यांना ताप आला.

सुरुवातीला लसीचा डाेस घेतल्याने साईडइफेक्ट असतील म्हणून डॉक्टरांच्या

सल्ल्यानेच त्यांनी उपचारासाठी गोळ्या घेतल्या. मात्र, ताप उतरत नाही हे बघितल्यानंतर मात्र

कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे त्यांनी कोराेना चाचणी केली. त्यात

त्या पॉझिटिव्ह निघाल्या; पण डगमगल्या नाहीत. डॉक्टरांनी त्यांच्या

ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी लक्ष

ठेवले जेव्हा ऑक्सिजन लेव्हल ८८ झाली. तेव्हा मात्र कुटुंबीयांनी खासगी

रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस ऑक्सिजनवर ठेवावे लागले; परंतु नंतर

ऑक्सिजनची लेव्हल वाढली आणि त्यांना लगेचच पाचव्या दिवशी डिस्चार्च

मिळाला; परंतु यादरम्यान त्यांचे धाकटे चिरंजीव संजय हे पॉझिटिव्ह झाले.

त्यांच्यापाठोपाठ थोरले बंधू ॲड. मनोज आंबाडे हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संजय यांंच्या पत्नी सुजाता आणि मृण्मयी व मृगांश ही दोन मुले तसेच मनोज यांच्या पत्नी तनुजा तसेच वेदिका आणि वेदांत ही दोन अपत्ये

असे सर्वच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले; परंतु

सर्वांनीच भीतीने घाबरून न जाता कोरोनावर निश्चित मात करू,

अशीच जिद्द बाळगली आणि सर्वच कुटुंब कोरोनामुक्त झाले.

इन्फो...

गड सर करणाऱ्या व्हायरल आजी

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात

सर्व आंबाडे कुटुंबीय सहलीसाठी हरिहर गड येथे गेले. त्यावेळी आशाबाई या

गड चढतील, असे कोणाला वाटलेे नव्हते. मात्र, त्यांनीही गड चढण्याची तयारी

दर्शवली आणि कुटुंबीयांनी साथ दिली. त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभरात अनेक

माध्यमांत व्हायरल झाला. आंबाडे कुटुंबीय अलीबाग येथील असून नाशिकमध्ये सुमारे पन्नास वर्षांपासून स्थायिक आहेत. दुगाव येथे त्यांची शेती असून आशाबाई १९९५-९६ पासून शेतीत काम करतात. आता वयामुळे त्या तेथे जात नसल्या

तरी घरातही सतत काही ना काही कामात व्यस्त असतात. योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने

त्या पंधरा ते वीस आसने आणि प्राणायम नियमित करतात. मुलांना आणि विशेष

करून नातंवडांना आसने शिकवून त्या करवून घेतात. एकत्रित कुटुंब आणि तेथील

सकारात्मक वातावरण ही मोठी ऊर्जा असल्याचे आशाबाई सांगतात.

-------------------

छायाचित्र आर फोटोवर ०२ आंबाडे फॅमीली नावाने.