शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

सत्तर वर्षांच्या आजींची उबदार किमया

By admin | Updated: August 29, 2016 01:16 IST

सुयांची जादू : विणकामाद्वारे विकसित केले विविध प्रकार

भाग्यश्री मुळे  नाशिकआनंदवली येथे राहणाऱ्या सत्तर वर्षांच्या आजींनी विणकाम कलेत वाखाणण्याजोगी कामगिरी केली असून, एवढ्या वयातही त्या तितक्याच उत्साहाने उबदार लोकर आणि सुई हाताळत एकाहून एक सरस कलाकृती घडवत आहेत. सिलिंडर कॅप, पांचोला आधुनिक गळ्याची जोड, मानेचा पट्टा, काश्मिरी कॅप, लेडिज वुलन टॉप त्यांनी स्वत:ची कल्पकता वापरत विकसित केले आहेत. लोकरी कपड्यांमध्ये कुठला नवा प्रकार, नवीन डिझाइन दिसताच त्या ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात.उषा भोसले असे त्यांचे नाव असून नुकत्याच त्या शिक्षकीपेशातून निवृत्त झाल्या आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी विणकामाच्या सुया हाती घेतल्या आहेत आणि आज वयाच्या सत्तरीतही त्या त्यांच्या हाती तितक्याच उत्साहाने आणि जोमाने चालत आहेत. या सुयांच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो प्रकार तर तयार केलेच पण ८०० ते ९०० महिला, मुलींनाही घडविले आहे. यातील अनेकींना विणकामातून रोजगाराचा मार्ग मिळाला तर अनेकींना आपल्या प्रियजनांसाठी हवे तसे उबदार कपडे विणण्याची संधी मिळाली आहे. उषाताई मूळच्या धुळे जिल्ह्यातील बेटावदच्या. त्यांच्या आई शिक्षिका होत्या. उषाताई गिरणारे, गंगापूर येथील शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करताना शिवणकाम, विणकाम विषयातही आवडीने रस घेत.१९८१ साली त्या आनंदवलीच्या शाळेत आल्या. येथेही त्यांनी अनेक मुलींना विणकामाचे धडे दिले. २००२ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. तेव्हापासून त्या विणकामाला भरपूर वेळ देत आहेत. उषातार्इंच्या घरी लोकरीच्या अगणित प्रकारांनी एक खोलीच भरलेली आहे. त्यात पायमोजे, बेबी सेट, आबालवृद्धांचे स्वेटर, शाल, जॅकेट, पांचो, कॅप, तोरण, पशुपक्षी, रुमाल, चादर, आसने, पिशव्या, कुशन कव्हर, टॉप अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. मानेचा पट्टा हा प्रकारही त्यांनी कल्पकतेने विकसित केला असून, हा पट्टा थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना किंवा मानदुखीचा त्रास असणाऱ्यांना वरदान ठरतो आहे. ज्यांना पायांचा त्रास आहे, बोटे वाकडी आहेत, अपुरी आहेत आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे चप्पल घालता येत नाही अशांसाठी चप्पल सोल असणारे वुलन सॉक्स विकसित केले आहेत. विविध नंबरच्या मोठ्या सुया, क्रोशाची सुई आणि मशीनवर विणकाम या तिन्ही प्रकारांमध्ये उषातार्इंनी विणकाम आत्मसात केले असून, आपल्याकडील कलेचा हा वसा त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनींबरोबरच मुलगी, सुना, नाती यांच्यापर्यंत प्रवाहित ठेवला आहे. उत्साह आणि चिकाटी घेऊन काम करणाऱ्या उषा भोसले समाजापुढे एक आदर्श म्हणून कार्यरत आहे.