सतरा नंबर अर्जासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:17+5:302021-02-05T05:44:17+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट ...

सतरा नंबर अर्जासाठी मुदतवाढ
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २ फेुब्रवारीपर्यंत नावनोंदणी व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेला १७ क्रमांकाचा अर्ज करून प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २ फेुब्रवारीपर्यंत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यासाठी २ नोव्हेंबर ते २५ जानेवारी २०२१ अशी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.