देवळाली कॅम्प : नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नायगाव, जायगाव मार्गे पाच वर्षापूर्वीच ठरला होता. मात्र मागील वर्षापासून नव्याने आखणी करताना नाशिकरोडमार्गे विहितगाव, बेलतगव्हाण, देवळाली कॅम्प, नानेगाव, वडगाव या गावांच्या मार्गाने रेल्वेचा प्रस्तावित मार्ग ठरवला आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व्हेसाठी पाठविलेल्या कामगारांना नानेगाव ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते.तसेच ग्रामसभा घेत जिल्हा प्रशासनाला रेल्वे मार्गात सर्व बागायती क्षेत्र जाणार असल्याचे कळवून पूर्वी ठरलेल्या व रेल्वेने हस्तांतरित केलेल्या मार्गानेच रेल्वे मार्ग नेण्याबाबत कळविले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान सदर रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम थांबल्याने नानेगाव ग्रामस्थ निश्चिंत झाले, पण शुक्रवारी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाºयांनी १२५ पेक्षा जास्त सातबारे उतारे नानेगाव तलाठी कार्यालयातून घेऊन गेल्याचे समजताच ग्रामस्थ तलाठी कार्यालयाजवळ एकत्र आलेहोते.यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ग्रामस्थांनी एकत्र राहून रेल्वे मार्गाचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनकरण्याचा निश्चय करण्यात आला. रेल्वे मार्गाला विरोध बळकट करण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा वडगावपर्यंतचा आराखडा दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.लोकप्रतिनिधींचा दुटप्पीपणानाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा यापूर्वी सर्व्हे करताना दहा वर्षांत रेल्वे प्रशासनाने नायगावमार्गे सिन्नरच्या इंडिया बुल्सपर्यंत ज्या जागा रेल्वेकडे अधिग्रहित करण्यात आल्या त्या मार्गानेच रेल्वे जाणार असल्याचे सांगितले होते. असे सांगणाºयांमध्ये रेल्वेबरोबरच राजकीय नेतेही होते. निवडणुकी दरम्यान निवडणूक लढविणाºया उमेदवाराने गिरणारे येथे भाषण करताना नव्याने रेल्वेचा मार्ग अंतिम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गावानुसार भाषण बदलणाºया नेत्यांचा दुटप्पीपणा यानिमित्ताने उघडकीस आला आहे.
नाणेगावच्या शेतकऱ्यांचl सातबारा रेल्वे प्रशासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:05 IST
नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
नाणेगावच्या शेतकऱ्यांचl सातबारा रेल्वे प्रशासनाकडे
ठळक मुद्देनाशिक-पुणे रेल्वे मार्ग : शेतकऱ्यांची विरोधात घोषणाबाजी