विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत साडेसहाशे मतदारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:26 IST2019-03-05T22:26:08+5:302019-03-05T22:26:30+5:30
सिन्नर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातून एकूण ६५० अर्ज नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेले आहेत.

विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत साडेसहाशे मतदारांची नोंदणी
सिन्नर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातून एकूण ६५० अर्ज नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेले आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसह ग्रामीण भागातील मतदान नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम शनिवार व रविवार अशी दोन दिवस राबविल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे व सहायक निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांनी दिली. आगामी लोकसभा सार्वत्रिक या निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मतदार यादीतील नाव वगळणीसाठी १२, मतदार यादीतील दुरुस्तीसाठी २०, मतदारसंघामध्ये स्थानांतरासाठी ३ फॉर्म प्राप्त झालेले आहेत. अशाप्रकारे सदर विशेष मतदार नाव नोंदणी मोहिमेस संपूर्ण तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. यावेळी सर्व मतदान केंद्रांवर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नाव नोंदणीसाठी ६२४ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. २१ नाशिक या लोकसभा मतदारसंघातील १२०, सिन्नर विधानसभा मतदारसंघात दोन टप्प्यांत झालेल्या मोहिमेत १४०० नवमतदारांचे नोंदणी अर्ज दाखल झाले आहेत. नाव नोंदणीसाठी अर्ज दाखलमतदार नाव नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी या दोन दिवशी तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रांवर विशेष मतदार नाव नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. यादिवशी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी विशेष पुनरीक्षण ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसीय मोहिमेत तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर बीएलओंकडे नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहे.