सात हजार आत्महत्या
By Admin | Updated: May 20, 2017 01:33 IST2017-05-20T01:33:24+5:302017-05-20T01:33:35+5:30
नाशिक : ७ हजार १०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आताच्या युती सरकारच्या काळात झाल्या असल्याचा आरोप ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केला

सात हजार आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : २००१ सालापासून आजवर २५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ७ हजार १०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आताच्या युती सरकारच्या काळात झाल्या असल्याचा आरोप ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केला, तर सत्ताधारी आणि मंत्री असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन आमच्या रक्तातच असल्याचा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. निमित्त होते शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाचे.येथील चोपडा बँक्वेट हॉलमध्ये शिवसेनेच्या वतीने ‘गर्जतो शेतकरी, मी कर्जमुक्त होणारच’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी उत्तर महाराष्ट्राचे कृषी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कृषी अधिवेशनाचे उद््घाटन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले, तर पहिल्या सत्राचा समारोप सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
सुरुवातीलाच अधिवेशनाचे उद््घाटन उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले, आजचे अधिवेशन शेतकऱ्यांना दिशा देणारे ठरणार आहे. पीक मालाला भाव नाही. गारपिटीने शेतमाल उद््ध्वस्त झालेला असताना आज प्रगतिशील शेतकरीही आत्महत्या करीत आहे. आपल्या सरकारच्या काळातच ७१०० शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत आत्महत्या केल्या आहेत.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी साहेबराव पवार, मंगला चव्हाणके, हिरामण शिंदे, रावसाहेब गोरे, धनंजय जाधव, योगेश कदम, नानासाहेब पळसकर, राजेंद्र देशमुख, विजय जाधव, प्रियंका जोशी, डॉ. एस. के. पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठासमोेर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना प्रवक्ते आमदार नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, हेमंत गोडसे, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, सुहास सामंत, रवींद्र मिर्लेकर, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, प्रताप सरनाईक यांच्यासह जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जयंत दिंडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, संतोष गायकवाड, सत्यभामा गाडेकर, श्यामला दीक्षित, मसूद गिलानी, देवानंद बिरारी, योगेश बेलदार, संदीप गायकर, दिगंबर मोगरे, रमेश धोेंगडे, यतीन वाघ, भगवान भोगे आदी उपस्थित होते.