विजयनगर परिसरात साडेसहा फुटीचा नाग पकडला
By Admin | Updated: July 30, 2016 01:08 IST2016-07-30T01:07:08+5:302016-07-30T01:08:39+5:30
विजयनगर परिसरात साडेसहा फुटीचा नाग पकडला

विजयनगर परिसरात साडेसहा फुटीचा नाग पकडला
भगूर : येथील सर्पमित्र बिस्मील्ला खान यांनी विजयनगर परिसरातून काळा पट्टा असलेला साडेसहा फुट लांबीचा नाग पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.विजयनगर येथील प्रताप गायकवाड यांचा मळा व घराजवळील परिसरात कोब्रा नागाचा महिन्याभरापासून संचार हेता. परिसरातील नागरिक व गायकवाड यांनी अनेकवेळा या नागाला बघितले होते. त्यामुळे नागरिकांसह बालगोपाळ हे भितीने घाबरले होते. आज या नागाचे पुनश्च दर्शन झाल्याने सर्पमित्र बिस्मील्ला खान यांना बोलविले. तेव्हा त्यांनी तत्काळ येऊन मोठ्या शिताफीने साडेसहा फुट कोब्रा नागास पकडले यावेळी नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या ३० वर्षापासून भगूर-देवळालीसह ग्रामीण भागात जाऊन मी हे सर्प पकडुन जंगलात सोडून देतो. एखाद्याचा जीव वाचविणे हे मोठे पुण्यवान काम आहे व आपली सामाजिक बांधिलकी असल्याचे समजुन असून निस्वार्थी व विनामुल्य ही जनतेची आपण सेवा करत असून यापुढेही ही सेवा अहोरात्र २४ तास करत राहु. आपल्या या समाजोपयोगी कार्याबद्दल विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे असे सर्पमित्र बिस्मील्ला खान यांनी सांगितले.