पंचवटी विभागात सात संवेदनशील केंद्रे
By Admin | Updated: February 21, 2017 01:12 IST2017-02-21T01:12:06+5:302017-02-21T01:12:17+5:30
दीडशे उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य; दीड हजार कर्मचारी नियुक्त

पंचवटी विभागात सात संवेदनशील केंद्रे
पंचवटी : पंचवटीत एकूण २४ जागांसाठी सहा प्रभागांत १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. सर्वाधिक जास्त उमेदवार प्रभाग १ व २ मध्ये २८ उमेदवार, तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये केवळ १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहा प्रभागांत २९२ मतदान केंद्र असून, यातील सात मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. पंचवटी विभागातील सहा प्रभागात एकूण दोन लाख २० हजार ८३५ मतदार संख्या असून, यात १ लाख १७ हजार ४८५ पुरुष, तर एक लाख तीन हजार ३५० महिला मतदार आहेत. सर्वांत कमी ३०,५०९ मतदार हे प्रभाग क्रमांक १ मध्ये आहेत, तर सर्वाधिक ४२,९१० मतदारसंख्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये आहे. पंचवटीतील फुलेनगर मनपा शाळा ५६ / ६७, हिरावाडीतील मनपा शाळा क्रमांक ५५, मखमलाबाद नाका येथील केबीएच शाळेतील तीन मतदान केंद्र, भावबंधन मंगल कार्यालय आणि काळाराम मंदिर येथील बळवंत माधव देशमुख विद्यालय हे सात मतदान केंद्र संवेदनशील आहेत. (वार्ताहर)