सातपूरच्या सराईताकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:17 IST2017-10-01T00:17:28+5:302017-10-01T00:17:55+5:30

सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच्या चार बॅटºयांचाही समावेश आहे़

 Seven lakhs of valuables seized from Satpur | सातपूरच्या सराईताकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सातपूरच्या सराईताकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच्या चार बॅटºयांचाही समावेश आहे़  युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना सातपूर गाव खोका मार्केट ते अमरधाम रोडवरील श्याम अहेर यांच्या पडक्या घरात अक्षय भारती हा मोबाइलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती़ पोलीस उपनिरीक्षक सहारे, पोलीस नाईक महाजन, नांद्रे, सानप यांनी सापळा रचून अक्षय भारती यास ताब्यात घेतले़  पोलिसांनी भारतीकडून १३ महागडे फोन व चार बॅटºया असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Seven lakhs of valuables seized from Satpur