शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जुने नाशिकमध्ये सात तास वीजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:11 IST

जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे

ठळक मुद्देवीजतारा भुमीगत करण्याची जुनी मागणी ही समस्या अर्धा तास किंवा एक तास नव्हे तर तब्बल सहा ते सात तास कायमदर पाच ते दहा मिनिटांनी वीजपुरवठा खंडीत-सुरळीत

नाशिक : उन्हाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सोमवारी (दि.१२) शहराच्या कमाल तपमानाचा पारा थेट ३६ अंशाच्या पुढे सरकला होता. त्यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत असल्याने अंगाची काहिली होत होती, अशा स्थितीत सकाळपासून जुने नाशिक गावठाण परिसरात वीजेचा लपंडाव सुरू होता.जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे. वीजतारा भुमीगत करण्याची जुनी मागणी कायमस्वरुपी प्रलंबित आहे. याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची असलेली उदासिनता कमी होत नसल्याने नाराजी नागरिकांमध्ये कायम आहे; मात्र दुसरीकडे वीजपुरवठाया भागात सुरळीत केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपुर्वी संपुर्ण जुने नाशिकमधील वीजपुरवठा रात्री अचानकपणे बंद झाला होता. यावेळी नागरिकनी भद्रकाली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली होती. यावेळी दुध बाजारमधील मौला बाबा दर्गाजवळील रोहित्रामध्ये बिघाड होऊन संपुर्ण परिसरात अंधार पसरला होता. यावेळी वायर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वीजपुरवठा सुरळीत करण्यास असमर्थता महावितरणकडून दर्शविण्यात आली होती. यावेळी कोकणीपुरा भागातील एक जागरूक नागरिकाने वाढत्या उष्म्याला कंटाळून घरामध्ये ठेवलेली वायर काढून देत कर्मचा-यांना त्वरित दुरूस्ती करण्यास सांगितले. सुमारे अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने जुने नाशिककरांना शुक्रवारची रात्र जागून काढण्याची आलेली वेळ टळली. या समस्येला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या नाशकात वीजेचा लपंडाव सुरू होता. दर पाच ते दहा मिनिटांनी वीजपुरवठा खंडीत-सुरळीत होत असल्यानेआश्चर्य व्यक्त केले जात होते. ही समस्या अर्धा तास किंवा एक तास नव्हे तर तब्बल सहा ते सात तास कायम राहिली.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी हवीमहावितरणकडून भोंगळ कारभार जुने नाशिक भागात थांबवावा आणि जुनाट वीजतारा, फ्यूज, रोहित्रांवरील जुने साहित्य बदलण्याची मागणी होत आहे. सातत्याने वीजपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याबरोबर वीजेचाही वापर वाढतो. घरामधील पंखे, कुलर, फ्रिज अशा उपकरणांचा वापर सर्वाधिकरित्या नागरिकांकडून केला जातो. त्यामुळे महावितरण प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन