शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

भाजपाच्या सात नगरसेवकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:46 IST

महापालिकेत सत्ता असली तरी राजी-नाराजी आणि त्यातच काही जण माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याने भाजपचे सात नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक : महापालिकेत सत्ता असली तरी राजी-नाराजी आणि त्यातच काही जण माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याने भाजपचे सात नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील नाशिकरोड येथील एका नगरसेवकाने आमदार आणि शहराध्यक्ष यांनी एकत्रित जाऊनदेखील प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.१६) घडलेल्या या घडामोडींनी भाजपची चिंता वाढली आहे.महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक असून, पक्षाला पूर्ण बहुमत आहे. मात्र तीन वर्षांत भाजपाअंतर्गत बऱ्याच घडामोडी झाल्या असून, त्याचे पडसाद महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील गटबाजी आणि त्यानंतर बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी केलेले पक्षांतर या सर्व राजकीय घडामोडी आता अडचणीच्या ठरल्या आहेत. त्यातच राज्यात सत्ता असेल तर अडचण नव्हती, परंतु आता ती शक्यता दिसत नसल्याने अनेक आयाराम हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपने सहलीचा घाट घातला असला तरी त्यातदेखील अडचणी आल्या आहेत. केवळ ४८ नगरसेवक दौºयावर गेले आहेत. उर्वरित काही नगरसेवक गेले नसले तरी त्यातील मच्छिंद्र सानप, सुनीता पिंगळे, प्रियांका माने, सुमन सातभाई, कमलेश बोडके, पूनम धनगर, विशाल संगमनेरे हे नगरसेवक दौºयावर गेले नाहीत. त्यामुळे सानप समर्थकांचा शिक्का असलेले हे नगरसेवक सहलीला न गेल्याने त्यांच्याविषयी भाजपातच चर्चा सुरू झाली. अर्थात यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. तरीही यातील एका नगरसेवकाकडे भाजपचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले आणि भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांनी नकार दिला. अर्थात यातील काही नगरसेवकांनी माध्यमांशी बोलताना प्रकृती अस्वास्थ आणि व्यवसाय अशी कारणे सांगितली आहेत, तर कमलेश बोडके यांनी पक्षातील कोणत्याही मूळ भाजप नगरसेवक असेल त्यालाच महापौरपदाची संधी द्यावी, अशी मागणी केली. व्यवसायामुळे त्यांनी सहलीवर जाण्याबाबत असमर्थता व्यक्त केली, मात्र पक्षाबरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे अनेकांनी कारणे सांगितली. मच्छिंद्र सानप हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे ते पक्षाबरोबर राहतील किंवा नाही याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही.तीन नगरसेविकांनी तर वैद्यकीय कारण दिले असून, त्यामुळे पक्षांवर त्यांना विश्वास ठेवावा लागला आहे. सर्व जण भाजपबरोबरच आहेत असे सभागृह नेते सतीश सोनवणे सांगत असले तरी प्रत्यक्षात किती नगरसेवक पक्षाबरोबर राहतील हे आज सांगणे अशक्य असल्याचेच दिसत आहे.शिवसेनेचे नगरसेवकही भाजपच्या संपर्कातभाजप आणि शिवसेनेच्या वतीने सत्ता स्पर्धा वाढत आहे. बाळासाहेब सानप हे शिवसेनेत दाखल झाल्याने ते भाजपने उमेदवारी नाकारल्याचा आणि आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राजकीय समीकरणे बदलवतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपला खरी चिंता आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे दहा ते बारा नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका इच्छुकाने केल्याने दोन्ही पक्षात संशय वाढत चालला आहे.संकटमोचकाची प्रतीक्षाभाजपचे किंबहूना सरकारचे संकटमोचक असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर बरीच भिस्त आहे. शनिवारी (दि.१६) ते नाशिकमध्ये नव्हते. मात्र त्यांनी अनेक नगरसेवकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असे सांगण्यात आले. पक्षाचे उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकरदेखील आता नाशिकमध्ये दाखल होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा