कामगारांच्या विविध अडचणींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 23:52 IST2015-12-14T23:52:32+5:302015-12-14T23:52:33+5:30
कामगारांच्या विविध अडचणींचा निपटारा

कामगारांच्या विविध अडचणींचा निपटारा
सातपूर : भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी सिन्नर येथील विडी कामगारांच्या पेन्शनबाबतच्या अडीअडचणी समजावून घेऊन काही तक्रारींचा निपटारा केल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.
नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने सिन्नर येथील कामगार चौकातील विडी कामगार संघाच्या कार्यालयात विडी कामगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी कामगारांच्या पेन्शनबाबतच्या समस्या, तक्रारी, अडीअडचणी समजावून घेतल्या. काही तक्रारींचा निपटारा जागेवरच केला. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.
तसेच पी.एफ. आणि विविध योजनांची माहिती दिली. उपस्थित कामगारांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले. फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर गुजराथी, सरचिटणीस नारायण आडणे, दत्ता निकम यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवर्तन अधिकारी आर.डी. शिरसाठ यांनी केले.