लोकअदालतीत 208 प्रकरणांचा निपटारा

By Admin | Updated: June 30, 2014 01:27 IST2014-06-30T01:27:10+5:302014-06-30T01:27:45+5:30

लोकअदालतीत 208 प्रकरणांचा निपटारा

Settlement of 208 cases in public | लोकअदालतीत 208 प्रकरणांचा निपटारा

लोकअदालतीत 208 प्रकरणांचा निपटारा

 

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या ९१४ पैकी २०८ प्रकरणे निकाली निघाली, तर मोटार अपघात नुकसान भरपाईपोटी सुमारे दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली़
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालये, जुव्हेनाईल न्यायालयांनी सहभाग घेतला़ लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ११ पॅनलची निर्मिती करण्यात आली होती़ याबरोबरच दावा दाखलपूर्व प्रकरणांची निर्मिती करण्यात आली होती़ बाल न्यायालयातील प्रकरणांकरिता एका स्वतंत्र पॅनलची निर्मिती करण्यात आली होती़
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोकअदालतीप्रसंगी मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ एल़ देशपांडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी, न्यायालयातील प्रबंधक व कर्मचारी वृंद, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Settlement of 208 cases in public