येवल्याचे सेतू कार्यालय बनले एजंटांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:09 IST2017-09-10T23:57:49+5:302017-09-11T00:09:14+5:30
येथील सेतू कार्यालय एजंटांचा अड्डा बनले असून, सरकारी कर्मचारी त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप येथील मनसे विद्यार्थी सेनेच्या युवकांनी निवेदनाद्वारे केला आहे. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देण्यात आले.

येवल्याचे सेतू कार्यालय बनले एजंटांचा अड्डा
येवला : येथील सेतू कार्यालय एजंटांचा अड्डा बनले असून, सरकारी कर्मचारी त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप येथील मनसे विद्यार्थी सेनेच्या युवकांनी निवेदनाद्वारे केला आहे. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देण्यात आले.
येथील सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी थेट वशिलेबाजी चालत आहे. काही तोतया कार्यकारी अधिकारी विद्यार्थ्यांकडून विविध दाखले काढण्यासाठी परस्पर पैसे उकळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. इतरांना दाखल्यासाठी तारीख पे तारीख दिली जात असल्याचे तक्र ारदारांचे म्हणणे आहे. सध्या चालू परिस्थिती बदलली नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मनसे विद्यार्थी उपजिल्हा प्रमुख सुनील खडके, गोरख खडके, तालुका अध्यक्ष राहुल राजगुरू, तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड, संघटक सोनू गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप चव्हाण, किरण पवार यांच्या स्वाक्षºया आहेत.