‘एनडीएसटी’साठी सर्वपक्षीय बचाव समितीची स्थापना

By Admin | Updated: November 24, 2014 00:23 IST2014-11-24T00:22:31+5:302014-11-24T00:23:15+5:30

एनडीएसटी’साठी सर्वपक्षीय बचाव समितीची स्थापना

Setting up of All-party Rescue Committee for NDST | ‘एनडीएसटी’साठी सर्वपक्षीय बचाव समितीची स्थापना

‘एनडीएसटी’साठी सर्वपक्षीय बचाव समितीची स्थापना

नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (एनडीएसटी) साठी सर्वपक्षीय बचाव कृती समितीची आज स्थापना करण्यात आली. संघटनेमध्ये होत असलेला संपूर्ण भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला़
आज हुतात्मा स्मारक येथे झालेल्या शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश सोनवणे यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्षपदी एस़ एऩ बोराडे, राजेंद्र लोंढे, सहकार्यवाहपदी लक्ष्मण महाले व निमंत्रक म्हणून पुरुषोत्तम रकिबे यांची निवड करण्यात आली आहे़ सोनवणे यांचे बेकायदेशीर सदस्यत्व रद्द करणे, संघटनेच्या नवीन शाखा, नोकरभरती, गाळे, जागा खरेदी, बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करणे, पदाधिकाऱ्यांचा वेतन व भत्त्याचा खर्च वसूल करणे आदिंसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली़
याप्रसंगी प्रकाश सोनवणे यांच्यासह प्रकाश वाघ, हिरामण शिंदे, वासुदेव बधान,
रघुनाथ हाळदे, एकनाथ पाटील, संजय पवार, सखाराम जाधव,
सुभाष भामरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Setting up of All-party Rescue Committee for NDST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.