दूरसंचार विभागाची सेवा कोलमडली
By Admin | Updated: October 22, 2014 22:44 IST2014-10-22T22:43:32+5:302014-10-22T22:44:40+5:30
दूरसंचार विभागाची सेवा कोलमडली

दूरसंचार विभागाची सेवा कोलमडली
येवला : अंदरसूल परिसरात ऐन दिवाळीच्या काळात दूरसंचार विभागाची सेवा दोन दिवसांपासून खंडित झाली आहे. पुन्हा एकदा ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
येवला तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अंदरसूल गाव परिचित आहे. तसेच परिसरातील इतर महत्त्वाची गावे मिळून एकूण ३० हजार लोकसंख्या अंदरसूल परिसरात आहे. नाशिक -औरंगाबाद या महामार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून अंदरसूल परिचित आहे.
अंदरसूल परिसरातील भ्रमणध्वनीधारकांची संख्या ७० ते ८० टक्के इतकी आहे. त्यात दूरसंचार सीम कार्ड धारकांची संख्या ४० टक्के इतकी आहे . त्यात लॅँडलाइन धारकांची संख्या आणि ब्रॉडबँडधारकांची संख्या इतराच्या तुलनेत मोठी आहे.
सरकारी दवाखाना, बँका, पोलीस चौकी शासकीय कार्यालये, उप बाजार आवार इत्यादी सर्व दूरसंचारच्याच सेवेवर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकाच्या व्यवहारावर परिणाम होत आहे. फोन न लागणे , चालू कॉल कट होणे, फोन चालू असून, सुद्धा स्वीच आॅफ सांगणे, इंटरनेट सेवा ठप्प होणे, या सारखे प्रकार ऐन सणासुदीच्या काळात घडत आहे. (वार्ताहर)