नोकराचा मालकाला गंडविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST2021-06-24T04:11:20+5:302021-06-24T04:11:20+5:30
याप्रकरणी जनरल वैद्यनगर येथे राहणाऱ्या अमित सुरेश गाबा यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ...

नोकराचा मालकाला गंडविण्याचा प्रयत्न
याप्रकरणी जनरल वैद्यनगर येथे राहणाऱ्या अमित सुरेश गाबा यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गाबा यांचे कापड दुकान असून, त्या दुकानात नोकर शोएब भोलू शहा (रा. फकीरवाडी, नानावली) हा कामाला आहे. त्याने गाबा यांना फोन करून आपल्याला कापड मालाबाबत व उधारी पैशांविषयी बोलायचे असल्याचे खोटे सांगून रविवारी दुपारी साडेचार वाजता अमरधामकडून तपोवनकडे जाणाऱ्या रोडवर बोलावून घेतले. त्यानंतर गाबा त्याठिकाणी गेले असता शोएब याचे साथीदार समीर शेख व मारिया पूर्ण नाव माहीत नाही. यांनी एका चारचाकी वाहनात बसवून गाबा यांच्याकडे पैसे तसेच मोबाईल व सोन्याच्या वस्तूंची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये झटपट झाली. त्यात संशयितांनी गाबा यांच्या ताब्यातील मोबाईल, पैसे लुटण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.