शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

नाशकातील सराफ बाजार पाण्याखाली ;जोरदार पावसामुळे पूरस्थिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 19:10 IST

नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४  ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच ...

ठळक मुद्देनाशिकमध्ये दीड तास मुसळधार पाऊस सराफ बाजारात पाणी शिरल्याने पूरस्थितीपावसाच्या पाण्यामुळे सराफी पेढ्यांचे नूकसान

नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४  ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच दिवशी फटका बसला. शहरात सुमारे दिडतास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्णशहर जलमय होऊन सराफ बाजारातील सखल भागात दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सराफ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शहरातील पाण्याचा प्रवाह एकवटून सराफ बाजारात येत असल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. शहरात रविवारी (दि.६) अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे  या भागातील सराफ व्यावसायिकांसह, भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना त्यांचे साहित्य जमा करण्याची संधीही मिळाली नाही. तर परिसरातील सराफांच्या पेढ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाºया पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून सातत्याने पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी केली जात असतानाही व्यावसायिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात जोरदार पाऊस झाल्यास त्याचे पडसाद नेहमीच सराफ बाजारात उमटत असल्याचे दिसून येत आहे.  शहरातील जुनी व ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाजारातील व्यावसायिकांमध्ये बाजारपेठ विकसित करण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ पूररेषेच्या कारणामुळे पैसा असूनही सराफ व्यावसायिकांना त्यांच्या पेढ्या विकसित करता येत नाही.  प्रत्येक वेळी येणाºया पुराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या प्रशासनाकडून पुराचे साचलेले पाणी गृहीत धरून पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे सराफबाजारच पूर रेषेत आल्याने येथील व्यावसायिकांना येथील पेढ्या विकसित करता येत नाही. मात्र यासाठी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका