बेवारस बॅगमुळे खळबळ
By Admin | Updated: January 7, 2016 23:44 IST2016-01-07T23:36:24+5:302016-01-07T23:44:25+5:30
श्री काळाराम मंदिरातील घटना : बॅगेत आढळल्या मूर्ती

बेवारस बॅगमुळे खळबळ
पंचवटी : येथील श्री काळाराम मंदिरात सकाळच्या सुमाराला एक सुटकेस व रेक्झिन बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या बेवारस बॅगबाबत पोलिसांना माहिती कळविताच पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या दोन्ही बॅगची तपासणी केली. सदर बॅगांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती तसेच शंख असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर बॅगा गुजरातच्या भावनगर येथील व्यापाऱ्याच्या असून त्या त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
गुजरात राज्यातील भावनगर येथील जगदीश हरगोविंद सोपाढिया व तुलसीदास नारायणदास पटेल हे दोघे व्यापारी देवदेवतांच्या मूर्ती तसेच शंख विक्रीसाठी श्री काळाराम मंदिरात आले होते. सकाळच्या सुमारास श्री काळाराम मंदिरात गेल्यानंतर तेथे दुकानदार नसल्याने त्यांनी सुटकेस व कापडी रेक्झिनची बॅग एका दुकानासमोर ठेवून ते रामकुंडावर स्नानासाठी गेले. राममंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्या बॅगा दिसल्या.