नाशकात बेवारस स्फोटके सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:48 IST2017-10-03T23:48:09+5:302017-10-03T23:48:14+5:30

नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढे वस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटिनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी पोहचून तपासणी करून स्फोटकांची गोणी ताब्यात घेतली़

 Sensation caused by unmanned explosives in Nashik | नाशकात बेवारस स्फोटके सापडल्याने खळबळ

नाशकात बेवारस स्फोटके सापडल्याने खळबळ

नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढे वस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटिनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी पोहचून तपासणी करून स्फोटकांची गोणी ताब्यात घेतली़ याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, परिसरातील डोंगर फोडून खडीक्रेशरसाठी लागणाºया दगडासाठी या स्फोटकांचा वापर केला असल्याची परिसरात चर्चा आहे़

Web Title:  Sensation caused by unmanned explosives in Nashik