शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ आदिवासी सेवक शंकरराव मराठे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 20:56 IST

अभोणा : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक व डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकरराव सखाराम मराठे उपाख्य अण्णासाहेब यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीतीरावर होईल.

ठळक मुद्दे सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीतीरावर अंत्यसंस्कार होईल.

अभोणा : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक व डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकरराव सखाराम मराठे उपाख्य अण्णासाहेब यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीतीरावर होईल.ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब बिडकर यांचे विश्वासू अनुयायी म्हणून अण्णासाहेबांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. मूळचे धमनार (ता. साक्री) येथील रहिवासी, परंतु बिडकरांच्या सान्निध्यात जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिमपट्टा हेच कार्यक्षेत्र राहिले. कळवण तालुका रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नाशिक जिल्हा समन्वय व पुनर्विलोकन समितीचे सदस्य, कळवण तालुका वीज मंडळ समन्वय समितीचे सदस्य, नाशिक जिल्हा औद्योगिक सहकार मंडळ सदस्य, कळवण तालुका शेतकी सहकारी संस्था अध्यक्ष व संचालक, कळवण पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तालुका ग्रामोद्योग संघाचे संस्थापक अध्यक्ष, डांग सेवा मंडळाचे संचालक, चिटणीस व उपाध्यक्ष, वसंतदादा सहकारी साखर कारखाना विठेवाडीचे मुख्य प्रवर्तक, मराठा समाज कल्याणकारी संस्थेचे संस्थापक चिटणीस अशा विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा निर्माण केला.तत्कालीन आदिवासी विकासमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी सेवक पुरस्कार तसेच डांग सेवा मंडळाच्या कर्मवीर दादासाहेब बिडकर आदर्श कार्यकर्ता या पुरस्काराने ते सन्मानित झालेत. नाशिक जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता विजय मराठे, नंदकुमार मराठे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.(२६ शंकरराव मराठे)

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिक