नाशिक- शिवसेनेचे माजी गटनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दत्तात्रेय पेखळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.नाशिक महापालिकेची १९८२ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर दहा वर्षे प्रशासकिय राजवट होती. १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली तेव्हा पहिल्या निवडणूकीत ते निवडून आले होते. गटनेता म्हणून त्यांची कारकिर्द देखील उठावदार होती. जनसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता. नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँकेचे देखील संचालक आणि अध्यक्षपद भूषविले होते. बॅँक आर्थिक अडचणीत असताना त्यांनी ढोल बजाव आंदोलन करून वसुली मोठ्या प्रमाणात केली होती आणि बॅँक वाचवली होती.पत्नी, मुलगा मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. महापालिकेचे माजी शहर अभियंता मार्तडराव पाटील व अॅड. वसंतराव पेखळे यांचे ते बंधू होत. पेखळे यांच्यावर आज दुपारी नाशिकरोड येथे अंत्यसंसकार करण्यात आले.
नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:12 IST
नाशिक- शिवसेनेचे माजी गटनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दत्तात्रेय पेखळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन
ठळक मुद्दे१९९२ मध्ये प्रथम निवडणूक जिंकली होती.नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँकेचे अध्यक्षपद भूषविले होते.