वरिष्ठ पोलीस निरिक्षक कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:53 IST2017-08-14T15:53:19+5:302017-08-14T15:53:28+5:30
शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीमधील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड
नाशिक : शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीमधील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर शिवाजीराव कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. एकूणच नाशिक पोलीस दलात दोन राष्ट्रपती पदक यंदा जाहीर झाले आहे.
कड हे यापुर्वी जुने नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्याअगोदर त्यांनी दहशतवाद विरोधी पथकामध्येही सेवा दिली आहे. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारांची पाळेमुळे उखडून काढण्यास यश मिळविले. सामाजिक सौख्य व कायदा सुव्यवस्था जुने नाशिकसारख्या अतिसंवेदनशील भागात टिकवून ठेवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दरम्यान, काही दंगलखोर समाजकं टकांच्याही त्यांनी वेळीच मुसक्या आवळून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यांच्या धाडसी कामगिरीच्या बळावरच त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली.