शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 01:02 IST

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक आणि आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर (६५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

नाशिक : समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक आणि आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर (६५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केले असल्याने त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द केले जाणार आहे.नाशिकमधील समाजवादी चळवळी आणि आंदोलनांमध्ये ठाकूर यांचा मोलाचा सहभाग होता. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष मूल्य हे त्यांच्या चिंतनाचे आणि लेखनाचे विषय होते. गेल्या बारा वर्षांपासून आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेसाठी आणि मराठी शाळांच्या चळवळीसाठी ते झटत होते. अशी शाळा सुरू करून त्यांनी मराठी शाळांसाठी नवी उमेद जागविली. त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. नरक सफाईची गोष्ट, टीचर हे त्यांची अनुवादीत पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ठाकूर हे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये अग्रेसर होते. नाशिक महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीची मोठी चळवळ उभी केली होती. समाजवादी विचारांची तुकडी तयार करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. समता आंदोलनाच्या पायाभरणीमध्ये तत्कालीन तरुणांची तयारी करून घेतली. दरम्यान, त्यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता पी अ‍ॅँड टी कॉलनीतील निवासस्थानी दर्शनासाठी आणले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रDeathमृत्यू