ज्येष्ठ नागरिकांकडून आदिवासी मुलांना मदत :

By Admin | Updated: November 4, 2015 23:18 IST2015-11-04T23:18:24+5:302015-11-04T23:18:45+5:30

ज्येष्ठ नागरिकांकडून आदिवासी मुलांना मदत :

Senior citizens help tribal children: | ज्येष्ठ नागरिकांकडून आदिवासी मुलांना मदत :

ज्येष्ठ नागरिकांकडून आदिवासी मुलांना मदत :


इंदिरानगर : येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घुमोडी आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त शालेय साहित्य आणि फराळाचे वाटप करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून बेळुज, काळुस्ते, सांडगाव, पत्र्याचापाडासह विविध आदिवासी पाड्यांमध्ये शालेय साहित्य आणि दिवाळीचा फराळ ज्येष्ठ नागरिक दरवर्षी वाटप करतात. यंदा सालाबादप्रमाणे घुमोडी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन व फराळ आणि इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कम्पास, वह्या, पेन व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रमेश नागरे, अरविंद पाटील, प्रवीण नागरे, अनाजी वलवे, सुरेश कांबळेंसह शिक्षकवृंद उपस्थित होता.

Web Title: Senior citizens help tribal children: