उत्कर्ष मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
By Admin | Updated: August 9, 2015 22:42 IST2015-08-09T22:41:37+5:302015-08-09T22:42:18+5:30
उत्कर्ष मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

उत्कर्ष मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
नाशिक : सिडकोतील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व ‘सूर्याेदय’ स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस नाना महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
विजयनगर येथील वाणी समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापू शिंपी, मनोहर चव्हाण, मुकुंद मांडगे, रवींद्र बागुल, राकेश जगताप, संदीप खैरनार, अमर सोनवणे, दिगंबर जगताप, मधुकर कापडणे आदि उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक वसंतराव जगताप, भालचंद्र सोनवणे, रत्नाकर बागुल, श्रीमती इंदुबाई पवार, तुकाराम निकुंभ, मोहन बोरसे, सुरेश पवार, प्रभाकर बागुल, नामदेव बिरारी, सुधाकर बिरारी, केशव गवांदे, कौशल्याबाई कापडणे आदिंना सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उद्धव जगताप यांनी स्वागत, तर सूत्रसंचालन प्रकाश बोरसे यांनी केले. (प्रतिनिधी)