ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST2021-04-09T04:14:43+5:302021-04-09T04:14:43+5:30

--- लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथून पाथर्डी गावाकडे पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला एका ...

The senior citizen was robbed by the Totaya police | ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी लुटले

ज्येष्ठ नागरिकाला तोतया पोलिसांनी लुटले

---

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथून पाथर्डी गावाकडे पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला एका तोतया पोलिसाने सुमारे ८० हजाराला गंडा घातल्याची घटना भरदुपारी घडली. यापूर्वीही इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे तोतया पोलिसांनी एका वृद्धाला लुटले होते. या घटनांनी इंदिरानगर पोलिसांना नवे आव्हान दिले आहे.

पाथर्डी फाटा येथून वामन निकम (६४, श्याम रो-हाऊस अयोध्या कॉलनी) हे बुधवारी (दि. ७) दुपारी बाराच्या सुमारास पायी जात होते. यावेळी रस्त्यालगत असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली दोन अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी निकम यांना थांबविले. ‘आम्ही पोलीस आहोत, या भागात चोरी झाली असून, शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही लोकांची तपासणी करत आहोत’ असे सांगून निकम यांची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास सांगून पिशवीतून हातचलाखीने ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व अंगठी लंपास करत पोबारा केला. याप्रकरणी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात ‘त्या’ तोतया पोलिसांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The senior citizen was robbed by the Totaya police