जॉगिंग ट्रॅकच्या कामावरून सेना-भाजपात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:10+5:302021-07-04T04:11:10+5:30

सिडकोतील शिवशक्ती चौकात असलेल्या नैसर्गिक पावसाळी नाल्यात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला परिसरातील नागरिकांनी ...

Sena-BJP jumped from jogging track work | जॉगिंग ट्रॅकच्या कामावरून सेना-भाजपात जुंपली

जॉगिंग ट्रॅकच्या कामावरून सेना-भाजपात जुंपली

सिडकोतील शिवशक्ती चौकात असलेल्या नैसर्गिक पावसाळी नाल्यात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. नैसर्गिक नाला हा पाणी वाहून जाण्यासाठीच असणे गरजेचे असताना त्या ठिकाणी नाल्यांमध्ये जॉगिंग ट्रॅक करणे हे चुकीचे असल्याने नागरिकांनी भाजपच्या महिला नगरसेवक अलका अहिरे यांना गुरुवारी निवेदन देत, काम बंद पाडले होते. दरम्यान, शुक्रवारी याच भागातील दुसऱ्या बाजूच्या महिलांनी शिवशक्ती नगर नाल्यावरील जॉगिंग ट्रॅकचे बंद पडलेले काम त्वरित सुरू व्हावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवशक्ती नगरमधील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना दिले.

याप्रसंगी शिवशक्ती नगरमधील बाळासाहेब सांगळे, राजेंद्र वाघ, छगन धिवर, रमाबाई परदेशी, सचिन गोहिल, दादाभाऊ गोडसे, शिवप्रकाश सहानी, दिलीप दवे, मुक्ताबाई डंगारे, कांतीलाल सुर्वे, चित्रा निरभवणे, ममता मत्सागर, प्रदीप मोरे, शीतल चव्हाण, उदयभान प्रजापती, फकिरा पाटील, लता पाटील, ज्योती शिंदे, सविता वर्मा, नीतू पांडे, शुभांगी लंके, महेश चांदवडकर, मनीषा पाटील, आदींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी बांधकाम विभागाचे अभियंता ए. के. काझी यांना घेराव घातला. अखेर बडगुजर यांनी जॉगिंग ट्रॅकचे काम कुठल्याही प्रकारे थांबणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचे समाधान झाले.

कोट===

सिडको उड्डाणपुलाला महापौरांनी विरोध केला. उंटवाडी स्मशानभूमीला भाजप नगरसेवकाने विरोध केला, तर आता जॉगिंग ट्रॅकचे काम भाजप नगरसेविकेने थांबविले. परंतु, नागरिकांच्या जनहिताचे काम शंभर टक्के करणार.

-सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगर प्रमुख

........

कोट===

शिवशक्ती नगर नाल्यावर होत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला आमचा विरोध नाही. या कामामुळे ड्रेनेज लाईन फुटली असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ड्रेनेज लाईनचे काम करून मिळावे अशी आमची मागणी आहे.

- अलका आहिरे, नगरसेविका

(फोटो ०३ निवेद) - शिवशक्ती नगरमधील महिलांच्या वतीने शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना निवेदन देताना मुक्ताबाई डंगारे, कांतीलाल सुर्वे, चित्रा निरभवणे, ममता मत्सागर, प्रदीप मोरे, शीतल चव्हाण, उदयभान प्रजापती, फकिरा पाटील, लता पाटील, आदी.

Web Title: Sena-BJP jumped from jogging track work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.