नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे जूनमध्ये चर्चासत्र

By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T00:12:15+5:302014-05-30T01:04:13+5:30

सिडको : नाशिकमधील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने येत्या जून महिन्यात तीनदिवसीय माहिती व तंत्रज्ञान विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे प्रशासकीय व्यवस्थापक पीयूष सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Seminar in Nashik Engineering Cluster in June | नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे जूनमध्ये चर्चासत्र

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे जूनमध्ये चर्चासत्र

सिडको : नाशिकमधील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने येत्या जून महिन्यात तीनदिवसीय माहिती व तंत्रज्ञान विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे प्रशासकीय व्यवस्थापक पीयूष सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने सातत्याने उद्योजकांची भरभराट व्हावी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उद्योजकांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यंदाच्या वर्षीही येत्या जून महिन्यात २० जून ते २२ जून या तीन दिवसांच्या कालावधीत माहिती व तंत्रज्ञानविषयक चर्चासत्र व प्रदर्शन (आय-एक्सो- २०१४) चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे.
या प्रदर्शनात प्रकल्प मूल्यांकन आणि बाजार बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबरोबरच एकत्र कंपनी उत्पादन, सेवा आणि प्रक्रियाबद्दल एकाच छताखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विशेष तज्ज्ञांकडून नाशिक आयटीमधील चिंता व फॉरवर्डबाबत चर्चासत्र करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात व चर्चासत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी सोमाणी यांनी केले.
यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे निशिकांत अहिरे, हर्ष गुणे, तसेच कन्झ्युमर सोसायटी ऑफ इंडियाचे गिरीश पगारे, कन्झ्युमर असोसिएशन ऑफ नाशिकचे विनायक माळी, धीरज छाजेड, निमाचे समीर पटवा आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Seminar in Nashik Engineering Cluster in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.