मालेगावी जीएसटीवर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST2017-08-04T23:23:36+5:302017-08-05T00:21:11+5:30
अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून देशात एकच करप्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली असल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन व्यवसाय व रोजगार वाढेल, असा सूर जीएसटी चर्चासत्रात व्यक्त झाला.

मालेगावी जीएसटीवर चर्चासत्र
संगमेश्वर : अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून देशात एकच करप्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली असल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन व्यवसाय व रोजगार वाढेल, असा सूर जीएसटी चर्चासत्रात व्यक्त झाला.
महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर व मालेगाव पॉवरलूम बुनकर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॅप्पी हॉलमध्ये जीएसटी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष व एम. बी. केमिकल्स्चे संचालक अनिलकुमार लोढा यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पूर्वी करावर कर आकारणी होत असल्याने वस्तूंच्या किमती जास्त होत्या. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे होते. मात्र जीएसटीमध्ये एकच कायदा व कर आकारणीचा दर एकच राहणार आहे. जीएसटी ही सोपी करप्रणाली आहे. सर्व प्रकारच्या व्यापाºयांनी ही नवीन करप्रणाली समजून आत्मसात करण्याची गरज आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त एस. एच. भाकरे, उपायुक्त अविनाश भामरे व मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सतीश कासलीवाल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मालेगाव पॉवरलूम बुनकर असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शेर मोहंमद, दिनेशकुमार लोढा, सी. एम. लोढा, संतोष लोढा यांच्यासह कारखानदार, इतर व्यावसायिक उपस्थित होते. शेवटी पॉवरलूम बुनकर असोसिएशनचे सचिव अन्सारी शब्बीर अहमद यांनी आभार मानले.