कळवण महाविद्यालयात चर्चासत्र

By Admin | Updated: January 13, 2017 00:41 IST2017-01-13T00:41:42+5:302017-01-13T00:41:55+5:30

कळवण महाविद्यालयात चर्चासत्र

Seminar in Kalvan College | कळवण महाविद्यालयात चर्चासत्र

कळवण महाविद्यालयात चर्चासत्र

कळवण : मानूर येथील लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी, ‘नॅक/एनबीए मानांकन’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय परिसंवाद संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे उपस्थित होते, तर डॉ. भाऊसाहेब शिंदे व प्रा. किशोर कोठावदे आदि उपस्थित होते. नॅक, एनबीए मानांकनाच्या बाबतीत डॉ. साधना शाही, डॉ. राकेश सोमानी, डॉ. रंगनाथ शिंदे व डॉ. संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य अविष मारू यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रावसाहेब शिंदे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विविध महाविद्यालयांना परिसंवाद आयोजित करण्याकरिता प्रायोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. महाविद्यालयांचे मानांकन ही काळाची गरज असून, स्पर्धेच्या युगात चांगले मानांकन असलेली महाविद्यालयच टिकतील, असे यावेळी सांगितले. परिसंवादाच्या समारोपप्रसंगी डॉ. व्ही.के. मौर्या यांनी सांगितले की, महाविद्यालयांनी मानांकनाच्या प्रक्रियेत भाग घेताना मनापासून यात स्वत:ला सामावून घ्यावे म्हणजे मानांकनाच्या प्रक्रियेत यश मिळेल. सूत्रसंचलन प्रा. संदीप गोडसे यांनी केले. यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष सुराणा व राजेंद्र सुरवसे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Seminar in Kalvan College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.