नरासबिहारी करंडकमध्ये आजपासून उपांत्य फेरी
By Admin | Updated: November 21, 2014 00:07 IST2014-11-20T23:40:15+5:302014-11-21T00:07:38+5:30
नरासबिहारी करंडकमध्ये आजपासून उपांत्य फेरी

नरासबिहारी करंडकमध्ये आजपासून उपांत्य फेरी
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलव नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित रासबिहारी क्रि केट करंडकात उद्यापासून (दि़ २१) उपांत्य फेरीचे सामने सुरू होत आहेत़ उपउपांत्य फेरीत झालेल्या जोरदार लढतीनंतर रासबिहारी स्कूल, रचना विद्यालय, सेंट लॉरेन्स व दिल्ली पब्लिक स्कूलच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे़ आज झालेल्या लढतीत रासबिहारी संघाने सिके्रड हार्टवर ३० धावांनी विजय मिळवला़ दुसऱ्या सामन्यात स्वामिनारायण स्कूलने चार गडी राखून विस्डम हायस्कूलचा पराभव केला़ दुपारच्या सत्रात काकासाहेब देवधर स्कूलने ए़ पी़ पटेल संघावर दहा गडी राखून विजय मिळवला, तर दिल्ली पब्लिक स्कूलने बॉईज टाऊनचा १६ धावांनी पराभव केला़ गुणांच्या आधारावर रासबिहारी स्कूल, रचना विद्यालय, सेंट लॉरेन्स व दिल्ली पब्लिक स्कूलच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला असून, उद्या उपांत्य फेरीची चुरस रंगणार आहे़