भ्रमणध्वनी संचाची हातगाडीवर विक्री
By Admin | Updated: November 25, 2015 22:38 IST2015-11-25T22:37:24+5:302015-11-25T22:38:55+5:30
मालेगाव : पचास रुपये मे मोबाइल लेलो भाई..!

भ्रमणध्वनी संचाची हातगाडीवर विक्री
किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्प
सध्या सर्वत्र लहान मुलांपासून मोठ्यांपर्र्यंत सर्वांच्या हातात
मोबाइल आला आहे. मोबाइलचे
खूळ किंवा एका प्रकारचे गरजेपेक्षा व्यसन लागलेले दिसून येते.
नवीन नवीन कंपनींचे महागडे
मोबाइल दिवसागणिक बाजारात येतात, तर काहीजण जुन्या मोबाइलवर आपली हौस भागवतात. मालेगावी अनेक दुकानांवर जुने मोबाइल तर मिळतातच; परंतु मोबाइलप्रेमींसाठी चक्क ठेला
गाडीवर मोबाइलची शहरात काही ठिकाणी विक्री होत आहे. ‘पचास रुपये मे मोबाइल लेलो भाई’ असा आवाज ऐकू येतो. मालेगावची चक्क जुन्या मोबाइलची विक्री ठेला गाडीवर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आधुनिक युगात मोबाइल वापरणे फार गरजेचे झाले आहे. सर्वांनाच एकाच वेळी अनेकांशी संपर्क ठेवण्यासाठी खिशात मोबाइल ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. नवीन मोबाइल अगदी एक लाखाहून दोन-तीन हजार रुपयांमध्ये दालनात मिळतात. परंतु ज्यांची एवढे पैसे
खर्च करण्याची कुवत अथवा इच्छा नसली तर सरळ सरळ जुन्या मोबाइल हॅण्डसेट विकत घेण्यासाठी शोध घेतात.
शहरातील जुना भंगार बाजार, सांडवा पूल काही ठिकाणी हे जुने चालू व बंद मोबाइल चक्क पन्नास रुपयांत हातोहात विकले जात आहेत. जुने भ्रमणध्वनी विकत घेतल्यावर किरकोळ दुरुस्ती अथवा नवीन बॅटरी टाकल्यास पुन्हा चालू होतात, असा दावा हे ठेला गाडीवर मोबाइल विक्री करणारे करतात. अगदी पन्नास रुपयात टाटा इंडिकॉम, रिलायन्स, ओनिडा, सॅमसंग, नोकियासह इतर काही नामांकित कंपनीचे जुने मोबाइल हॅण्डसेट (चालू-बंद) विकत घेण्यासाठी गर्दी होत आहे.
पन्नास रुपयात मोबाइल घेऊन दुरुस्त झाला तर ठिक नाही तर एफएम अथवा गाणे ऐकण्यासाठी कामी येतो. त्यामुळे पन्नास रुपयात जुना मोबाइल हॅण्डसेट घेण्यात अनेकजण उत्सुक होतात व दिवसभरात या बाजारातून ठेला गाडीवरून मोबाइल हॅण्डसेट
विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.