१०१ वृक्षारोपणानंतर हमीपत्रासह सेल्फी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:37+5:302021-09-10T04:20:37+5:30

नाशिक : पर्यावरण संवर्धन व जनजागृतीच्या उद्देशाने विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीमार्फत नागरिकांना बेल, जांभूळ, सीताफळ, कदंब ...

Selfie with guarantee after 101 tree planting! | १०१ वृक्षारोपणानंतर हमीपत्रासह सेल्फी !

१०१ वृक्षारोपणानंतर हमीपत्रासह सेल्फी !

नाशिक : पर्यावरण संवर्धन व जनजागृतीच्या उद्देशाने विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीमार्फत नागरिकांना बेल, जांभूळ, सीताफळ, कदंब आदी अस्सल आपल्या भागातील वृक्षांची १०१ रोपे वाटप करण्यात आली. यावेळी वृक्ष बँकेच्यामार्फत देशी वृक्षांचे रोप स्वीकारलेल्या सदस्यांना काळजीपूर्वक संवर्धनासाठी हमीपत्र घेऊन वृक्षवाढीबाबत सेल्फी पाठविण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा म्हणून वृक्ष बँकेची स्थापन करून अभिनव असा उपक्रम उमेश शिंदे यांनी हाती घेतला आहे. वृक्षारोपण करून जबाबदारी संपत नाही, तर ती अधिक वाढते त्यामुळेच वृक्षारोपण केल्यानंतर सेल्फी पाठवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. कृतिशील उपक्रम वर्षभर राबवित राहण्याचा संकल्पदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला. वृक्ष बँकेच्या माध्यमातून अनेक दानशूर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी यापुढे कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस, दशक्रिया, श्राद्धविधी, पुण्यस्मरण, विवाह आदी कार्यक्रमात बडेजाव रूढी-परंपरेला फाटा देऊन संस्थेच्या वृक्ष बँकेत रोपांच्या स्वरूपात डिपॉजिट करू शकतात वृक्ष बँकेकडून मोफत वृक्ष वाटप उपक्रमाला हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उमेश शिंदे, सुरेश खेताडे, संजय शिंदे, विजय खर्जुल, नितीन माळोदे, पोपट शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Selfie with guarantee after 101 tree planting!