शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे नाशिक महापालिकेला विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 15:25 IST

नाराजीचा सूर : तारांगण प्रकल्पात कार्यकर्त्यांकडून अभिवादन

ठळक मुद्देस्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महापालिकेने ‘तारांगण’ प्रकल्प उभारलेला आहेपुण्यतिथीदिनीही महापालिकेकडून साधी साफसफाईही केली न गेल्याने संताप व्यक्त

नाशिक - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनाचे महापालिकेला विस्मरण झाल्याने राष्ट्रवादी शहर कॉँग्रेससह चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात साफसफाई करत चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी महापालिकेचाही निषेध करण्यात आला.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महापालिकेने ‘तारांगण’ प्रकल्प उभारलेला आहे. शनिवारी (दि.२५) यशवंतरावांची पुण्यतिथी होती. परंतु, पुण्यतिथी असूनही तारांगण प्रकल्पात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आढळून आल्याने आणि महापालिकेला पुण्यतिथीचे विस्मरण झाल्याने राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘तारांगण’ प्रकल्पावर जाऊन परिसरात साफसफाई केली आणि तेथील यशवंतरावांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सरचिटणीस संजय खैरनार, युवक कार्याध्यक्ष अँड चिन्मय गाढे, शंकर मोकळ, अनिल परदेशी, महेश भामरे, सुनील दातिर, चेतन कासव, राहुल पाठक, डॉ संदीप चव्हाण, सोपान कडलग आदी उपस्थित होते.इन्फोकार्यकर्त्यांना कटू अनुभवयशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी काही चव्हाण प्रेमी तरुण तारांगण प्रकल्पावर आले होते. यावेळी त्यांनाही पुतळ्याची रंगरंगोटी झालेली नसल्याचे आढळून आले. सदर कार्यकर्ते १२ मार्च रोजी जयंतीदिनीही अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळीही त्यांना अशीच परिस्थिती दिसून आली होती. आता पुण्यतिथीदिनीही महापालिकेकडून साधी साफसफाईही केली न गेल्याने तरुणांनी संताप व्यक्त केला. यापुढे पुतळ्यास रंगरंगोटी करणे जर महापालिका प्रशासनाला परवडणारे नसेल तर आम्ही दर जयंती व स्मृती दिनी पुतळ्यास रंगरंगोटी करू असा मानस यावेळी तरुणांनी व्यक्त केला. यावेळी गोरख ढोकने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी भूषण काळे, कमलेश काळे, विक्रम गायधनी,जगदीश आहेर,शारीक शेख,आयुष पाटील आदी उपस्थित होते.इन्फोप्रशासनाचे स्पष्टीकरणमहापालिकेमार्फत महापुरुषांची जयंती साजरी केली जात असते. पुण्यतिथी दिनी कार्यक्रम घेतले जात नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासकीय सूत्रांनी केले आहे. मात्र, साफसफाईबाबत संबंधित विभागिय अधिकाऱ्याना विचारणा केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका