सॉफ्टबॉल राज्य संघात नाशिकच्या तिघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST2021-09-16T04:19:53+5:302021-09-16T04:19:53+5:30

नाशिक : राष्ट्रीय सब ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ...

Selection of three from Nashik in softball state team | सॉफ्टबॉल राज्य संघात नाशिकच्या तिघांची निवड

सॉफ्टबॉल राज्य संघात नाशिकच्या तिघांची निवड

नाशिक : राष्ट्रीय सब ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात पार पडली. या निवड चाचणीत नाशिकच्या संघातील तीन खेळाडूंची राज्य संघात निवड करण्यात आली.

१९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर रोजी कटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळालेल्या तिघांमध्ये प्रवीण चव्हाण, वेदांत राऊत आणि विजय राठोड यांचा समावेश आहे. या निवड चाचणीसाठी २६ जिल्ह्यांतील कुमार व कुमारी गटातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचा संघ गेल्या सहा वर्षांपासून सलग पदक विजेता असल्याने यावर्षीसुद्धा बलाढ्य आणि तुल्यबळ संघ निवडीसाठी चांगलीच चुरस होती. या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी नाशिक सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव हेमंत देशपांडे व मविप्र संस्थेचे क्रीडा शिक्षक हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Selection of three from Nashik in softball state team