राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
By Admin | Updated: November 8, 2014 00:41 IST2014-11-08T00:41:00+5:302014-11-08T00:41:34+5:30
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
नाशिक : आंध्र प्रदेशच्या रंगा रेड्डी येथे शालेय खेल प्राधिकरणाच्या वतीने ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षे वयोगटाच्या १४ व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी नाशिकच्या चौघांची राज्य संघात निवड झाली आहे, तर नाशिकच्या निर्मला चौधरी यांची महाराष्ट्र संघाच्या मार्गदर्शकपदी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकचे ऋत्विक शिंदे, रितेश देशमुख, आदित्य गोरे आणि सोनाली गर्जे या चार खेळाडूंची निवड झाली आहे. ऋ त्विक शिंदे (सिल्व्हर ओक शाळा), रितेश देशमुख (आदर्श शाळा), आदित्य गोरे (आदर्श शाळा), सोनाली गर्जे (न्यू ईरा शाळा) येथील हे विद्यार्थी आहेत़ सर्व विद्यार्थी नियमित जिल्हा क्र ीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. तेथे त्यांना राजू शिंदे, स्नेहल विधाते, जय शर्मा यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ऋ त्विक शिंदे याची फॉईल प्रकारामध्ये, रितेश देशमुख याची ईपी या प्रकारात, आदित्य गोरे आणि सोनाली गर्जे यांची सॅबर प्रकारात निवड झाली आहे़