शिक्षक भारतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:26+5:302021-07-26T04:13:26+5:30
कुकाणे : लक्ष्मी लॉन्स गोंदे मंगल कार्यालयात झालेल्या शिक्षक भारतीच्या मेळाव्यात शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी व्ही. एन. नाईक शिक्षण ...

शिक्षक भारतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची निवड
कुकाणे : लक्ष्मी लॉन्स गोंदे मंगल कार्यालयात झालेल्या शिक्षक भारतीच्या मेळाव्यात शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे साहेबराव कुटे यांची, जिल्हा कार्यवाहपदी विनायक लाड यांची तर कार्याध्यक्षपदी संजय देवरे यांची निवड करण्यात आली. शिक्षक आमदार कपील पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष के. के. आहिरे यांनी सहा वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी राजीनामा दिल्यावर रिक्त जागेवर साहेबराव कुटे यांची निवड करण्यात आली. तसेच याप्रसंगी जिल्हा कार्यवाह म्हणून इगतपुरीचे विनायक लाड, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कळवणचे संजय देवरे, उपाध्यक्ष म्हणून दिंडोरीचे मनोज मोगरे, सहकार्यवाह म्हणून नाशिकचे भाऊसाहेब बोराडे, तालुका अध्यक्ष कळवण- गोकूळ शेवाळे, देवळा- जिभाऊ शिंदे, मालेगाव प्रशांत पाटील, दिंडोरी सुरेश मोरे, इगतपुरी मनोज पाटील यांनाही नियुक्ती करण्यात आली. विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे , सुभाष मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार कपील पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गोंदेचे सरपंच शरद सोनवणे, श्याम पाटील, के. के. आहिरे, किशोर जाधव, एन. एन. खैरनार, संग्राम करंजकर, संजय पाटील, बापू शेरेकर, दिनेश आहिरे, दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, चंद्रशेखर शेलार, प्रशांत पाटील उपस्थित होते.