नगरसूल सोसायटी सभापतींची निवड अवैध

By Admin | Updated: May 8, 2016 22:40 IST2016-05-08T22:36:26+5:302016-05-08T22:40:29+5:30

शह-काटशह : सहायक निबंधकांनी केले संचालकपदही रद्दबात

The selection of municipal society chairmen is invalid | नगरसूल सोसायटी सभापतींची निवड अवैध

नगरसूल सोसायटी सभापतींची निवड अवैध

 लयेवला : नगरसूल विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदासह सभापतिपदाची निवड केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार येवला सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी या दोन्ही निवडी अवैध ठरवल्या आहेत. या घटनेने नगरसूल पंचक्रोशीत उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, राजकीय शह-काटशह देण्याची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही.
नवनाथ भागीनाथ बागल यांनी येवला सहकारी संस्था सहायक निबंधक यांच्याकडे १२ एप्रिल २०१६ रोजी दाखल केलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, सुनील पैठणकर हे नगरसूल विविध कार्यकारी सोसायटीवर लोकप्रतिनिधी म्हणून थेट निवडणुकीने निवडून आलेले नाहीत. त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेतले असताना, त्यांना संस्थेच्या सभापतिपदावर बसवता येते का? नगरसूल सोसायटीच्या विद्यमान संचालकपदाची निवडणूक २०११ मध्ये झाली होती. संचालक मंडळाने १५ जुलै २०११ रोजी पदभार स्वीकारला होता. या संचालक मंडळातील बाबासाहेब कोल्हे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा ११ आॅगस्ट २०१४ रोजी संचालक मंडळाने मंजूर केला. यानंतर १३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते संचालक मंडळातील रिक्त जागी सुनील पैठणकर यांची निवड केली. दरम्यान, परिघाबाई निकम यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २२ सप्टेंबर २०१५ रोजी सुनील पैठणकर यांची सभापतिपदी संचालक मंडळाच्या सभेत ठराव करून निवड करण्यात आली. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३-अब अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
नवीन सभापतीची निवड करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक होण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. स्वीकृत सदस्यपद यासह नगरसूल सोसायटीच्या सभापतिपदी सुनील पैठणकर यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे सहायक निबंधक यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: The selection of municipal society chairmen is invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.