आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची राजपथावरील पथसंचलनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST2020-12-31T04:15:56+5:302020-12-31T04:15:56+5:30

येथे राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सतीश इंदरलाल देवासी याची ...

Selection of a health university student for highway traffic | आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची राजपथावरील पथसंचलनासाठी निवड

आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची राजपथावरील पथसंचलनासाठी निवड

येथे राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान

विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक

सतीश इंदरलाल देवासी याची निवड झाली आहे.

पश्चिम क्षेत्रातून पथसंचलनासाठी स्वयंसेवक निवडीकरिता हैदराबाद

येथे पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर पार पडले. या शिबिरात

एकूण २८ मुले आणि २८ मुली सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट संचलन

आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणातून महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची

निवड करण्यात आली आहे. यामध्ये पथसंचलनासाठी उत्कृष्ट स्वयंसेवक

म्हणून सतीश देवासी याची निवड झाली आहे. देवासी हा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे रत्नागिरी जिल्ह्यातील घाणे-खुंट येथील एम.

ई. एस. आयुर्वेद या संलग्नित महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

पथसंचलन व सांस्कृतिक कार्यक्रमातील कार्यालयीन कामकाजाबाबत

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातील कक्ष अधिकारी के. आर.

पाटील, आबाजी शिंदे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Selection of a health university student for highway traffic