विभागीय पातळीवर निवड

By Admin | Updated: August 30, 2014 00:53 IST2014-08-30T00:09:41+5:302014-08-30T00:53:08+5:30

ज्योती विद्यालयाच्या कुस्तीपटूंची विभागीय पातळीवर निवड

Selection at the departmental level | विभागीय पातळीवर निवड

विभागीय पातळीवर निवड

  सातपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी विविध गटांत यश संपादन केल्याने त्यांची विभागीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ज्योती विद्यालयातील १४ वर्षे वयोगटात तुषार भावले- द्वितीय, संतोष आघाम- प्रथम, नीलेश जाधव- प्रथम, जीवन वाघमारे- प्रथम, अजय कुलाल- द्वितीय, प्रतीक ढगे- प्रथम, १७ वर्षे वयोगटात हितेश कुंवर- प्रथम, योगेश थोरात- प्रथम, अमोल घुगे- प्रथम, मयूर भालेराव- द्वितीय, सागर गामणे- द्वितीय, मनीष तिवडे- प्रथम आदि खेळाडूंनी विविध वजनी गटात यश संपादन केले आहे. या सर्व खेळाडूंची विभागीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना ज्योती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाठ, मारुती देवस्थानचे अध्यक्ष सुदाम नागरे, आर. आर. गांगुर्डे, क्रीडाशिक्षक ए. एन. शिरोळे, आर. के. कापडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या वतीने या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Selection at the departmental level