संस्कृतीची नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
By Admin | Updated: May 5, 2015 00:55 IST2015-05-05T00:55:19+5:302015-05-05T00:55:47+5:30
संस्कृतीची नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

संस्कृतीची नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय नेमबाजी स्पर्धेत एअर पिस्तूल या प्रकारात १४ वयोगटात संस्कृती संदेश अहिरे हिने कांस्यपदक पटकाविले. तिच्या या कामगिरीमुळे बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक अभय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे.