पेठ औद्योगिक संस्थेतील ९३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:40 IST2018-12-25T17:38:46+5:302018-12-25T17:40:06+5:30

पेठ : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध विभागातील नोकरीच्या संधी साठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास ...

The selection of 93 students of Peth Industrial Institute | पेठ औद्योगिक संस्थेतील ९३ विद्यार्थ्यांची निवड

पेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित रोजगार भरती मेळाव्यात निवड झालेल्या युवकांसोबत अंकीत आहूजा, महावीर कावी, नरिसंग राजू वर्मा, अभिषेक कुमार सिंह, प्राचार्य शांताराम राठोड आदी.

ठळक मुद्देरोजगार भरती मेळावा : सुझुकी मोटर्स गुजरात मध्ये संधी

पेठ : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध विभागातील नोकरीच्या संधी साठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास ९३ युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे.
गुजरात राज्यातील सुझूकी मोटर्सचे व्यवस्थापक अंकीत अहूजा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुलाखतीत फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मोटर मॅकेनिकल आदी विभागातील युवकांना संधी मिळाली. या रोजगार भरती मेळाव्यासाठी नाशिक जिल्हयासह महाराष्ट्रातून गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव, धुळे जिल्हयातून युवक सहभागी झाले होते. याप्रसंगी सुझूकीचे अंकीत आहूजा, महावीर कावी, नरिसंग राजू वर्मा, अभिषेक कुमार सिंह, प्राचार्य शांताराम राठोड आदी उपस्थित होते.

 

Web Title: The selection of 93 students of Peth Industrial Institute