शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात ४८३ उमेदवारांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:16 IST

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात ४८३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

सातपूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात ४८३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित या मेळाव्यासाठी विविध २२ कारखान्यांकडून एक हजार ६४४ रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली होती. या उद्योगांच्या प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक स्तरावर निवड केली. तत्पूर्वी मुलाखतीची पूर्व तयारी कशी करावी, मुलाखतीस कसे सामोरे जावे याबाबत करिअर सल्लागार मंगेश भणगे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी मार्गदर्शन करताना नोकरीइच्छुक उमेदवार, उद्योग आणि शासकीय महामंडळे यांना सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून रोजगार व स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे हे या मेळाव्याचे उष्ठ असून पात्रतेप्रमाणे उपलब्ध रिक्तपदांसाठी विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देऊन उपलब्ध संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक राजेश मानकर यांनी सांगितले की,आपल्याला रोजगार प्राप्त झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी नियम पाळणे महत्त्वाचे असते. मेहनत करून आणि आवश्यक कौशल्य प्राप्त केल्याने लहान पदांवरून मोठ्या पदावर प्रगती होते. यामुळे प्रथम मिळेल ती नोकरी करावी आणि पुढे जात राहावे. यावेळी व्यासपीठावर बीटीआरआयचे उपप्राचार्य एस. एस. भामरे, धुळे आयटीआयचे प्राचार्य एम. के. पाटील उपस्थित होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रजनी वाघ यांनी केले. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी आयटीआयचे प्रशांत बडगुजर, एस. यू. काळे, शंकर जाधव, अख्तर तडवी, अशोक चव्हाण, बाळू जाधव, रमाकांत कमानकर, मीनाक्षी वाघमारे, दर्शना धर्माधिकारी, नारायण थेटे, रावसाहेब गावित, प्रदीप गावित, सागर भाबड, मीना म्हस्के, महेंद्र महाले, कल्पना दवंगे, विजय चौधरी, राजू मोरे, सुभाष मोरे, कैलास गायधनी आदी उपस्थित होते.या उद्योगांनी नोंदविला सहभागया रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील ग्लॅक्सो स्मिथकेलाइन, आर्ट रबर, इपीसी इंडस्ट्रीज, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, राइटर सेफ गार्ड, डब्ल्यूएनएस ग्लोबल सवर््िहसेस, रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅप. अर्बन क्र ेडिट सोसायटी, सी.टी.आर. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, इंडोलाइन इंडस्ट्रिज, डेटामॅटिक्स् ग्लोबल सर्व्हिसेस, युरेका फोर्ब्स, क्लासपॅक, मुंगी इंजिनिअर्स, डिजी डाटा सोल्यूशन, बंडल टेक्नॉलॉजिस, धुमाळ पोल्ट्री इक्युपमेंट,अ‍ॅपेक्स प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, युवाशक्ती फाउंडेशन, केजीपी अ‍ॅटो, एंटरमॉन्ड पॉलिकेटर्स, व्हर्गो बीपीओनिर्मिती प्रिसिजन आदी उद्योगांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी