महिलेच्या खुनात वापरलेले हत्यार जप्त
By Admin | Updated: March 16, 2016 23:05 IST2016-03-16T22:58:33+5:302016-03-16T23:05:03+5:30
महिलेच्या खुनात वापरलेले हत्यार जप्त

महिलेच्या खुनात वापरलेले हत्यार जप्त
पंचवटी : मागील आठवड्यात पंचवटी परिसरातील टकलेनगरमधील सप्तशृंगी सोसायटीमध्ये राहणाऱ्या शिक्षिका भारती भास्कर पाटील (५०) यांची राहत्या घरात हत्त्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यात संशयिताने वापरलेला लोखंडी पाना हे हत्यार पोलिसांनी गोदापात्रात आढळून आले.
पाटील यांच्याकडे येणाऱ्या मोलकरणीचा जावई आरोपी सचिन गांगुर्डे याने पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पाना मारून त्यांना गंभीर जखमी करत गळा आवळून हत्त्या केल्यानंतर मयताची चप्पल व लोखंडी पाना गांगुर्डे याने कन्नमवार पुलावरून गोदापात्रात फेकला होता.
पोलीस या घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांचा पुरावा शोधत होते. दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या गांगुर्डे याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी कन्नमवार पुलाचा परिसर पिंजून काढला.
दरम्यान, नदीमध्ये चप्पल व पाना पोलिसांना आढळून आला. अद्याप मयताचा भ्रमणध्वनी आढळून आलेला नसून पोलीस शोध घेत आहे. (वार्ताहर)