छळवणुकीवर शिक्कामोर्तब : लाचप्रकरणामुळे महापालिका चर्चेत

By Admin | Updated: July 29, 2016 00:13 IST2016-07-29T00:02:04+5:302016-07-29T00:13:41+5:30

अग्निशामक दलातून निघाला भ्रष्टाचाराचा धूर

Seizure of harassment: municipal talk due to bribery | छळवणुकीवर शिक्कामोर्तब : लाचप्रकरणामुळे महापालिका चर्चेत

छळवणुकीवर शिक्कामोर्तब : लाचप्रकरणामुळे महापालिका चर्चेत

नाशिक : महापालिकेच्या अग्निशामक दलामार्फत अग्निप्रतिबंधक दाखल्यांसाठी होणारी लुबाडणूक गुरुवारी लाचखोर सब स्टेशन आॅफिसर राजेंद्र बैरागीच्या रूपाने समोर आली आहे. आम जनतेची ना हरकत दाखल्यांसाठी छळवणूक करणाऱ्या अग्निशामक दलातील भ्रष्टाचाराचा धूर अखेर बाहेर आल्याने दलातील एकूणच कारभाराबद्दल नागरिकांमधून
संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या अग्निशामक विभागामार्फत १५ मीटरपेक्षा उंच असलेल्या रहिवासी इमारती तसेच विशेष इमारती यांना बांधकामपूर्व अग्निशामक दाखला व अंतिम अग्निशामक दाखला दिला जातो. याशिवाय, विस्फोटक कायदा, गॅस सिलिंडर कायदा, पेट्रोलियम कायदा आदि कायद्याखाली आवश्यक असणारे अग्निप्रतिबंधक दाखले देण्यात येतात. प्रामुख्याने, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉजिंग यांना आवश्यक अग्निप्रतिबंधक दाखले

Web Title: Seizure of harassment: municipal talk due to bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.