गोमांस वाहतूक करणारा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:34+5:302021-09-08T04:20:34+5:30

काही कार्यकर्त्यांना गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुमन पेट्रोल ...

Seized truck transporting beef | गोमांस वाहतूक करणारा ट्रक जप्त

गोमांस वाहतूक करणारा ट्रक जप्त

काही कार्यकर्त्यांना गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुमन पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर सापळा रचून ट्रक थांबिवला. मालट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे आठ ते दहा टन गोमांस असल्याचे आढळून आले. तसेच ट्रकच्या पुढील बाजूस दोन व मागील बाजूस दोन अशा वेगवेगळ्या नंबर प्लेटही आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालक माजित खान शाहिदखान (२६) मालेगाव) व त्यांचे साथीदार क्लीनर शेख जावेद शेख दाऊद (३०) तसेच हेल्पर शेख फिरोज शेख रहमान (३४, तिघे रा. मालेगाव) यांना ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Seized truck transporting beef