जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Updated: January 24, 2017 23:59 IST2017-01-24T23:59:35+5:302017-01-24T23:59:50+5:30
जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखांचा ऐवज जप्त

जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखांचा ऐवज जप्त
नाशिक : उंटवाडीरोड परिसरातील क्रांतिनगरमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून अकरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६५ हजार ६७९ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ विशेष म्हणजे नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली़
क्रांतिनगरमधील देवी मंदिराजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित रवि हनुमंत गुंजाळ (रा. लक्ष्मणनगर,पेठरोड), श्याम एडिसन बोर्डे (रा. विसेमळा, कॅनडा कॉर्नर), दीपक आधार बाविस्कर (रा. सावतानगर, सिडको) विश्वनाथ नागोराव सुपसमिरे (रा. खोडेमळा, सावतानगर), संदीप वसंता डोंगरे (रा. कमोदनगर, तिडके मार्ग), दिनकर भालचंद्र वाणी (रा. पाटीलनगर, सिडको), दीपक पांडुरंग नाईक (रा. बाजीरावनगर, मिलिंदनगर), सीताराम नाना कोळी (रा. लवाटेनगर), चंद्रकांत मारिया जाधव (रा. बेथेलनगर), तुषार काळू जगताप (रा. सावतानगर) व छबुलाल शंकर गुजर (रा. बुद्धविहार, उत्तमनगर) हे जुगार खेळत होते़